भिलवडी प्रतिनिधी
प्रसिद्ध कवी सुभाष कवडे यांच्या गोल्डनपेज पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रकाश पेरणी या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरूवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.राजेंद्र माने (सातारा) यांच्या शुभहस्ते व भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून
अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख (अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा आटपाडी),प्रदिप पाटील(सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ) आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साहित्यिक सुभाष कवडे यांनी यापूर्वी १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.प्रकाश पेरणी हा त्यांचा ५ वा कविता संग्रह आहे.या कवितासंग्रहास सुप्रसिद्ध साहित्यिक कृष्णा इंगवले यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली असून, डॉ.रणधीर शिंदे मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी पाठराखण लिहिलेली आहे. त्यांच्या साहित्यास साहित्य क्षेत्रातील नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.गुरूवार दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे सायंकाळी ४:०० वा.होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशन सोहळा समिती,सार्वजनिक वाचनालय भिलवडी,सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ,पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.