भिलवडी प्रतिनिधी:
सर मुलगा आजारी आहे भारती हॉस्पीटल शी संपर्क साधून द्याल का? परिस्थिती फारच बेताची हाय बिल कमी करून द्याला लागतय,आमक्या तमक्याचे वडील वारलेत...साहेबांचे ते कट्टर कार्यकर्ते होते, नेत्यांच्या कानावर गोष्ट घाला.विजेच्या लपंडावाने शेतकरी हवालदिल झालाय महावितरणच्या अधिकाऱ्यांना कल्पना द्याल का?नदीत खडखडाट हाय धरणातून पाणी सोडायला सांगा की... बाळासाहेबांनी सी. एम. साहेबांना एक फोन घुमवला की जुळणी लागलीच म्हणून समजा.....ते नव्हं बाळासाहेब भागात कधी येणार हायती...?लेकाच्या लग्नाची पत्रिका द्यायची हाय त्यास्नी.गावाला महापुराचा वेढा पडलाय बोटीची यंत्रणा लावायला लगत्या...जनावरांना चारा न्हाय,लोकांना निवारा न्हाय...असे अनेकांचे अनेक फोन नि अनेक प्रश्न..पण फोन करणारे कधी थकले ना फोन उचलून प्रश्नांचा निपटारा करणारे थकले.हो साहेब डॉ.विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालयातून बोलतोय..तुमची माहिती आम्ही बाळासाहेब तथा डॉ.विश्वजीत कदम साहेबांच्या पर्यंत पोहोचविली आहे.हे उत्तर ऐकल की,संपर्क करणारा बिनधास्त झालाच म्हणून समजा.कारण खटक्यावर बोट जाग्यावर पल्टी अशी इथल्या कामकाजाची पद्धत.
पलूस कडेगावाचे आमदार,माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या भिलवडी ता.पलूस येथील जनसंपर्क कार्यालयाने पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला.या निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर,नेतेमंडळी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या प्रवासाविषयी समाधान व्यक्त करीत आमदार डॉ.विश्वजीत कदम आणि त्यांच्या सर्व यंत्रणेचे खास अभिनंदन केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.भिलवडीसह परिसरातील लोकांच्यापर्यंत आ.डॉ. विश्वजीत कदम यांना वारंवार पोहचणे शक्य नसल्याने, लोकांच्या प्रश्नांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, त्या अनुषंगाने त्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, आ. डॉ.विश्वजीत कदम यांच्या भिलवडी व परिसरातील दौऱ्या संदर्भात गावातील प्रमुख नेते, कार्यकर्ते व पत्रकार यांना याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने भिलवडी येथे आ.डॉ.विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून सुभाष आरबुने व संतोष चौगुले तर नितीन कदम हे शिपाई म्हणून काम करीत आहेत.
या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यालयीन वेळेत आणि कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त इतरवेळी ही सर्वसामान्यांचे आकस्मित प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जाते.कृष्णेला वारंवार येणाऱ्या महापूर काळात तर जनसंपर्क कार्यालयाची लोकांचा आधारवड ठरले.
यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास पाटील,दक्षिण भाग विकास सोसायटी माजी चेअरमन बाळासाहेब मोहिते, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, मोहन तावदर, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सतपाल साळुंखे,संताजी जाधव, विजय शिंदे,बाळासो जमादार, धनंजय पाटील, नंदकुमार कदम,रविंद्र यादव,महादेव मोरे,राजेंद्र कदम,विनायक भोळे, प्रशांत माने, बाळासो यादव,मुसा शेख,राजेंद्र मोहिते,सुभाष कवडे,बाबासाहेब मोहिते,उत्तम रांजणे,राहुल कांबळे,सनी यादव, पंडीत यादव, इम्रान जमादार,माळवाडी गावच्या सरपंच सुरैय्या तांबोळी,सदस्या भाग्यश्री वायदंडे यांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.