Sanvad News होम मिनिस्टर कार्यक्रमाचा कारंदवाडी येथील महिलांनी लुटला आनंद ; पद्मजा कबाडे यांनी जिंकली मानाची पैठणी

होम मिनिस्टर कार्यक्रमाचा कारंदवाडी येथील महिलांनी लुटला आनंद ; पद्मजा कबाडे यांनी जिंकली मानाची पैठणी


 आष्टा प्रतिनिधी

ग्रामपंचायत कारंदवाडी ता.वाळवा यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचामहिला उद्योग मेळाव्यास महिलांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.सौ.पद्मजा रोहन कबाडे यांनी मानाची पैठणी जिंकली.हास्ययात्राकार शरद जाधव यांनी उस्फुर्त, बहारदार व विनोदी शैलीत केलेल्या सूत्रसंचालननाने कार्यक्रम एका उंचीवर गेला.


या खेळातील विजेत्या महिला स्पर्धक पुढीप्रमाणे.द्वितीय क्रमांक - सौ.प्रियांका सरदेशमुख,तृतीय क्रमांक सुप्रिया मानवर,चौथा- सुप्रिया पाटील,पाचवा - दिपाली बाद्रे,ऑन द स्पॉट गेम सौ.पूनम खोत,भाग्यवान उपस्थिती - सौ. त्रिशला गायकवाड या सर्व विजेत्या महिलांना मान्यवरांचे हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

स्वयंसिद्धा कोल्हापूर च्या विश्वस्त सौ. तृप्ती पुरेकर यांनी बचत गटांचे सक्षमीकरण,महिला कोणकोणते व्यवसाय करू शकतात याची माहिती देत कारंदवाडी गावातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून भविष्यात सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती दिली.


या कार्यक्रमाचे कारंदवाडी ग्रामपंचायतीने नेटके संयोजन व व्यवस्थापन केले.गावातील महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.महिलांच्या जीवनाला नवी दिशा देऊन त्यांना छोटे मोठे उद्योग उभारून स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याच्या उस्फुर्त प्रतिक्रिया उपस्थित माता भगिनींनी व्यक्त केल्या.


कारंदवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच हिम्मत पाटील, उपसरपंच सौ. रुपाली सावंत, सदस्य सौ. अर्चना सरदेशमुख,सौ. नेत्राप्रभा लवटे, सौ. इंदुमती खामगळ, सौ. अरुणा हजारें, सौ. सुजाता खोत, सौ.मधुमती कांबळे, सदस्य संतोष वाडकर, रवींद्र गायकवाड, आशुतोष हाके मानसिंग हाके, किरण पाटील, अनिल देशमुख, सौ. शीला बासर, ग्रामसेविका सौ. मोहोतकर सर्व बचत गटातील सदस्य,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

To Top