Sanvad News महादेव माने यांच्या वसप कथासंग्रहास लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय गद्य पुरस्कार प्रदान

महादेव माने यांच्या वसप कथासंग्रहास लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय गद्य पुरस्कार प्रदान

इस्लामपूर प्रतिनिधी

 महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी यांच्यामार्फत देण्यात येणारा आणि  महाराष्ट्रातील साहित्यातील अत्यंत मानाचा समजला जाणारा लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय गद्य पुरस्कार २०२३ महादेव माने यांच्या वसप या पहिल्या कथासंग्रहास प्रदान करण्यात आला.रविवार दिनांक २१रोजी २८ व्या साहित्य संमेलन अध्यक्ष  बालाजी सुतार यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध साहित्यिक महादेव मोरे निपाणी यांच्या प्रमूख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 कथाकार महादेव माने हे खंडोबाचीवाडी ता.पलूस जिल्हा सांगली येथील असून त्यांचा वसप हा कथासंग्रह सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील साहित्य आणि वाचकामध्ये बहुचर्चित आहे. महादेव माने हे सुप्रसिध्द कथाकार आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्या अनेक कथांना राज्यस्तर पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या पहील्याच *वसप* या पुस्तकाची प्रकाशन पूर्व १५ दिवसात पाचशे प्रती वितरीत झाल्या आहेत. हे महाराष्ट्रातील यावर्षीचे सर्वाधिक चर्चेचे पुस्तक ठरले आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील वाड़मय पुरस्कार निवड  समितीने १५४ पुस्तकातून वसप कथासंग्रहाची निवड केली . रोख रक्कम पाच हजार, सन्मान चिन्ह, ग्रंथभेट, शाल, श्रीफळ पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य, मा. प्रा.शामराव (आण्णा) पाटील.म. सा. प. इस्लामपूर अध्यक्ष - डॉ.प्रा. दिपक स्वामी.संमेलन उद्घाटक.  डॉ संपतराव जाधव,संमेलन स्वागताध्यक्ष -श्री. कालिदास पाटील,तसेचजेष्ठकादंबरीकार,दि.बा.पाटील,हिमत पाटील, कवी रमजान मुल्ला, अभिजीत पाटील,सुधीर कदम, नितीन माळी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

To Top