Sanvad News सानेगुरुजी संस्कार केंद्राने केली भिलवडी मधील सफाई कामगारांची दिवाळी गोड.

सानेगुरुजी संस्कार केंद्राने केली भिलवडी मधील सफाई कामगारांची दिवाळी गोड.

     
सानेगुरुजी संस्कार केंद्राने केली भिलवडी मधील सफाई कामगारांची दिवाळी गोड.

भिलवडी प्रतिनिधी 

भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी भिलवडीतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे आणि भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

महिला आणि पुरुष सफाई कामगारांना फराळ व भेटवस्तू देण्यात आल्या.उद्योगपती व वाचनालयाचे अध्यक्ष माननीय गिरीश चितळे आणि माझी उपसरपंच चंदू भाऊ पाटील यांचे शुभहस्ते हे वाटप करण्यात आले.गेली वीस वर्षे संस्कार केंद्राचे वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी सफाई कामगारांची दिवाळी गोड केली जाते.कार्यक्रमाचे संयोजन आणि सर्वांचे स्वागत संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केले.तर बाळासाहेब माने सर यांनी आभार मानले. यावेळी मेजर उत्तम कांबळे,ग्रामपंचायत सदस्य विष्णू भोई, वाचनालयाचे विश्वस्त जी.जी.पाटील,संजय गुरव सर,मंत्रालयातील जीएसटी विभागातील अधिकारी पूजा माने, संस्कार केंद्राचे विद्यार्थी पालक आणि वाचनालयाचे सर्व सेवक उपस्थित होते महिला सफाई कामगारांना साडी भेटवस्तू आणि फराळ तर पुरुष सफाई कामगारांना फराळ आणि भेटवस्तू देण्यात आल्या सफाई कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमच्या दिवाळीचा आनंद आहे अशी भावना केंद्रप्रमुख सुभाष कवडे सर यांनी व्यक्त केली.या उपक्रमासाठी अनेक पालकांचे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

To Top