पलूस कडेगावमध्ये १२०० कोटींचा निधी आणला : आमदार डॉ.विश्वजित कदम;सोनहिरा खोऱ्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कडेगांव : प्रतिनिधी.
पलूस कडेगावच्या जनतेने कदम कुटुंबीयांना ज्या ज्या वेळेस साथ दिली.त्या वळेस या मतदारसंघाला मंत्री पदाची संधी मिळाली आहे. स्व.पतंगराव कदम यांनी कडेगांव पलूस तालुक्याची निर्मिती करत तालुक्यात विविध उद्योगधंदे निर्माण केले. त्यामुळे तालुक्यात विविध उद्योगधंद्यांना चालना मिळाली. त्यांचाच वारसा आज मी सांभाळत आहे. राज्यमंत्री असताना व त्यानंतर कार्यकाळात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात १२०० कोटींचा निधी मंजुर करून आणला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केले.
ते सोनहिरा खोऱ्यातील गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत बोलत होते.यावेळी भारती बँकेचे संचालक डॉ.जितेश कदम, सतीश पाटील, प्रमुख उपस्थित उपस्थित होते. पुढे बोलतांना विश्वजीत कदम म्हणाले की महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेची मुले शिक्षण घेऊन मोठी व्हावी या साठी स्व. पतंगराव कदम साहेबांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले अनेक दुर्गम भागात शाळा,विद्यालये काढली. देशात गरीब विद्यार्थ्यांना सरकार शालेय पोषण आहार देते या योजनेचे जनक डॉ. पतंगराव कदम आहेत. कोरोना महामारीच्या काळात ज्या वेळी शासकीय यंत्रणा कमी पडली त्या वेळी आम्ही भारती हॉस्पिटलचें दरवाजे पलूस कडेगावच्या जनतेसाठी २४ तास खुले केले हे आमचे काम आहे. ज्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी विश्वजीत कदम यांच्या नावाचा वापर करावा लागतो. त्यांनच्या खोट्या आश्वासनाला ही पलूस कडेगांवची जनता बळी पडणार नसल्याचा विश्वास यावेळी विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. या वेळीं नुकताच भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढलीं महिलांनी औक्षण केले. यावेळी सोनीला खोऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी महिला ग्रामस्थ उपस्थित होते.