धनगांवच्या पुरातन महानुभाव मठास तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार:- संग्राम देशमुख
धनगांव प्रतिनिधी
धनगांव येथील श्रीकृष्ण महानुभाव मठाचा जीर्णोद्धार करण्यासाठी व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या स्थानाचा विकास होणे उज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.या संदर्भात धनगांव मधील समस्त महानुभाव उपदेशी मंडळी संग्राम भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून या तीर्थस्थानाचा विकास होण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत धनगाव येथील महानुभाव श्रीकृष्ण मंदिरास राज्य शासनामार्फत तीर्थक्षेत्र विकास निधीतून ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अश मागणीचे संग्राम भाऊ देशमुख यांना निवेदन दिले.
तसेच रिद्धपूर येथील महानुभाव मठास भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 350 कोटी रुपयाचा निधी दिल्याबद्दल व मराठी भाषेस केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस यांचे व महायुती सरकारचे अभिनंदन केले.
यावेळी धनगाव चे भाजप नेते व पलूस तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य दीपक भोसले, उद्योजक उदय साळुंखे, भाजपचे पलूस तालुका दत्ता उतळे, सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश साळुंखे, सचिन साळुंखे, शरद साळुंखे, समाधान साळुंखे, शैलेश साळुंखे, अभिजीत साळुंखे, रंणजीत साळुंखे आदी उपस्थित होते.