Sanvad News शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ.विश्वजीत कदम यांना पर्याय नाही - महेंद्र लाड; बजरंगबलीच्या साक्षीने भिलवडीत डॉ.कदम यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ.विश्वजीत कदम यांना पर्याय नाही - महेंद्र लाड; बजरंगबलीच्या साक्षीने भिलवडीत डॉ.कदम यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

शेतकरी कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ.विश्वजीत कदम यांना पर्याय नाही - महेंद्र लाड; बजरंगबलीच्या साक्षीने भिलवडीत डॉ.कदम यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

भिलवडी प्रतिनिधी 

भिलवडी आणि कृष्णाकाठच्या गावात क्षारपड निर्मूलनासाठी स्व. डॉ.पतंगराव कदम व आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या योजना महत्वपूर्ण ठरल्या आहेत.भविष्यात शेती,शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्यासारख्या नेतृत्वाला पर्याय नाही असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा)लाड यांनी केले.

भिलवडी गावचे ग्रामदैवत बजरंगबलीच्या साक्षीने भिलवडीत डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा नारळ फुटला.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते हनुमान मंदिरात आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यापुढे बोलताना महेंद्र लाड म्हणाले की,स्व.संग्राम दादा पाटील यांची उणीव काँग्रसच्या कार्यकर्त्यांना जाणवत आहे.पण त्यांच्या पश्चात डॉ.विश्वजीत कदम यांच्यासह आम्ही सर्वजण भिलवडी करांच्या सोबत आहोत. डॉ. विश्वजीत कदम यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन विकास यात्रेचे साक्षीदार होऊया.

यावेळी भिलवडी मधील विविध नेतेमंडळी व काँग्रेस पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. विश्वजीत कदम यांच्या दूरदृष्टीचा व विकासकामांचा आढवा आपल्या मनोगतामधून घेत त्यांना पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातून विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला.

यावेळी ज्येष्ठ नेते यशवंत उर्फ (राजूदादा) पाटील, भिलवडीच्या सरपंच सौ.सीमा शेटे,माजी सरपंच विजयकुमार चोपडे,शहाजी गुरव,सौ.सविता महिंद,सौ.विद्या पाटील,पृथ्वीराज पाटील,बाळासाहेब चौगुले, बी.डी.पाटील, भू.ना.मगदूम,बाळासाहेब मोहिते,बाबासाहेब मोहिते,बाळासाहेब चौगुले, विलासआण्णा पाटील,रमेश पाटील,सचिन पाटील,आर.के.रोकडे, खंडू शेटे,मोहन तावदर,बाळासाहेब मोरे,मुसा शेख,सचिन पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर माजी सरपंच शहाजी  गुरव यांनी आभार मानले.

To Top