Sanvad News कडेगावचा धार्मिक एकोपा अभिमानास्पद : संग्रामसिंह देशमुख;विश्वजीत कदम यांना मोठा धक्का काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.मुस्लिम समाजाचा संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर पाठिंबा.

कडेगावचा धार्मिक एकोपा अभिमानास्पद : संग्रामसिंह देशमुख;विश्वजीत कदम यांना मोठा धक्का काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.मुस्लिम समाजाचा संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर पाठिंबा.

 

कडेगावचा धार्मिक एकोपा अभिमानास्पद : संग्रामसिंह देशमुख;विश्वजीत कदम यांना मोठा धक्का काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.मुस्लिम समाजाचा संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर पाठिंबा.

कडेगांव प्रतिनिधी:

कडेगाव शहर ही आमची राजकीय राजधानी आहे. असे काही मंडळी म्हणत आहेत. मग आज ही कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. शहरी भागातील सुविधा मिळत  नसून विरोधकांनी सत्तेचा उपयोग फक्त पद भोगण्यासाठी केला आहे. त्यामुळे कडेगावच्या जनतेने परिवर्तन घडवले आहे. शहरात प्रति माणसी ५५ लिटर पिण्याचे स्वच्छ पाणी आपन शहराला देणार आहे. शहरात अनेक जातीचे धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामध्ये काही मंडळी राजकीय स्वार्थापोटी या ऐक्याला गाल बोट लावण्याचा प्रयत्न करत असून कडेगांव कर सुज्ञ असल्याने संपूर्ण देशात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हे शहर नावारूपाला आले आहे. कडेगावचा धार्मिक एकोपा अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन २८५-पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती  भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी केले. ते कडेगांव शहरातील इनामदार मोहल्ला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या संवाद कोपरा सभेत बोलत होते.

यावेळी कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, ज्येष्ठ नेते चंद्रसंद देशमुख यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव प्रमुख उपस्थित होते. समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने संग्रामसिंह देशमुख यांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देत.सत्कार करण्यात आला. यावेळी अपशिंगे येथील भिकू साखरे, सतीश ननवरे, आनंदा सूर्यवंशी, विश्वास सूर्यवंशी यांच्या सह अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोड चिट्टी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे विश्वजीत कदम यांना मोठा धक्का बसला आहे.

पुढे बोलतांना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की कडेगाव शहराला अद्याप उन्हाळ्यात  दुष्काळाचा सामना करावा लागतो, पण तोही प्रश्न आम्हीं मार्गी लावला असून यापुढे कडेगाव ला वेळच्यावेळी आवर्तन मिळणार आहे. कडेगाव औद्योगिक वसाहतची ही हेळसांडना कुणामुळे झाली हे सर्वांना माहीत आहे. पण काळजी करण्याची गरज नसून पुढील पाच वर्षात ५ हजार कोटीचे मोठे मदर युनिट कडेगाव औद्योगिक वसाहतीत आणण्याचा मानस केला आहे. विरोधकांच्या २०० पाणी विकास कामे पुस्तकात सर्व आमची कामे आहेत. विरोधकांनी खरंच विकास केला असता तर त्यांना आज नोकऱ्यांचे अमिष वाटत दारोदारी फिरावे लागले नसते. जनता विरोधकांच्या कामावर समाधानी नाहीं. देशात भाजपा महायुतीचे सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारने विज पुर्ण पणे मोफत दिली आहे. लाडक्या बहिणी योजनांचा लाभ थेट महिलांना मिळाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता युती सरकारच्या कामगिरीवर खुश असून राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या चौफेर विकासाठी एक वेळ संधी द्या मतदारसंघाचा चौफेर विकास करणार असल्याची ग्वाही संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.

    स्व. आमदार संपतराव देशमुख यांनी जे टेंभू साठी जे कष्ट घेतले व दुष्काळी भागाचा कायापालट होण्यासाठी जो त्याग केला ते मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे व या गोष्टीचा जिवंत साक्षीदार आहे. टेंभू योजना ही " गणपती दूध पिते "अशी टीका ज्यांनी केली तेच आता टेंभूचे जनक म्हणून नावारूपाला आले आहेत. पण संपूर्ण जनतेला माहित आहे की स्व.संपतराव देशमुख हेच खरे टेंभूचे शिल्पकार आहेत.चंद्रसेन देशमुख.जेष्ठ नेते कडेगांव.

कडेगांव सारख्या दुष्काळी भागाचा जो कायापालट झाला तो फक्त टेंभूच्या पाण्याने यांचे सर्वस्वी श्रेय स्व. संपतराव देशमुख यांना आहे. स्व. संपतराव देशमुख जन्माला आले नसते तर. टेंभू योजनेचा जन्म झालाच नसता. टेंभू योजना नसती तर आपल्याला ऊसतोड कामगार म्हणुन घाटाखाली जावे लागले असते.धनंजय देशमुख. नगराध्यक्ष कडेगांव नगरपंचायत. 





To Top