Sanvad News बाळासाहेब यंदा काळजी नको..आम्ही साऱ्याजणी तुमच्या सोबतच आहोत - खंडोबाचीवाडी येथील महिलांचा निर्धार;डॉ.विश्वजीत कदम यांची भेट

बाळासाहेब यंदा काळजी नको..आम्ही साऱ्याजणी तुमच्या सोबतच आहोत - खंडोबाचीवाडी येथील महिलांचा निर्धार;डॉ.विश्वजीत कदम यांची भेट

 


बाळासाहेब यंदा काळजी नको..आम्ही साऱ्याजणी तुमच्या सोबतच आहोत - खंडोबाचीवाडी येथील महिलांचा निर्धार;डॉ.विश्वजीत कदम यांची भेट  

भिलवडी प्रतिनिधी : 

बाळासाहेब यंदा काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत असल्याचा निर्धार खंडोबाचीवाडी ता.पलूस येथील महिलांनी व्यक्त केला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. फुलांची उधळण करत व हालगीच्या ठेक्यावर डॉ.कदम यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून सदैव सोबत असल्याची खात्री दिली.

आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, संपूर्ण मतदारसंघात उत्साह आहे. परंतु मला या खंडोबाचीवाडी गावात अधिकच उत्साह पाहायला मिळाला. खंडोबाचीवाडी गाव नेहमीच पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. विरोधकांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. कुठल्याही योजनेला फसू नका.पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. खंडोबाचीवाडीत भविष्यकाळातही विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास व आशीर्वाद हीच माझी ऊर्जा आहे.

येथील युवक, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत भरपूर मताधिक्य मिळवून देवू असे सांगितले. येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विशाल शिंदे, शुभम जाधव यांनी डॉ.कदम यांना पाठिंब्याचे पत्र दिले.सर्व गावात रांगोळी काढली होती. यावेळी माणिक माने, विजय शिंदे, सतीश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top