Sanvad News ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी वाळवा तालुक्यात; बळीराजाने फोडले वाहनांचे टायर

ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी वाळवा तालुक्यात; बळीराजाने फोडले वाहनांचे टायर

 ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी वाळवा तालुक्यात; बळीराजाने फोडले वाहनांचे टायर


इस्लामपूर प्रतिनिधी:

बहे (ता. वाळवा) येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर  फोडले. उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये दर द्या, अन्यथा कारखान्याला एक कांडकेही जाऊ देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

सोमवारी दुपारी कृष्णा कारखान्याच्या दिशेने ट्रॅक्टर ट्रॉल्या भरून निघाल्या होत्या. बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ते अडवले. कार्यकर्त्यांनी वाहनांचे टायर फोडले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे म्हणाले, कारखान्याने उसाला पहिली उचल चार हजार रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करून ऊसतोड सुरू करावी. निवडणुकीत करोडो रुपये खर्च करतात, मात्र, शेतकऱ्यांच्या घामाला दाम देत नाहीत. कारखानदारांनी दिवाळीला बिल न देता शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुटले. यावेळी संघटनेचे | पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top