Sanvad News पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातून डॉ.विश्वजीत कदम यांच्या विजयाची हॅटट्रिक; गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातून डॉ.विश्वजीत कदम यांच्या विजयाची हॅटट्रिक; गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

 पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातून डॉ.विश्वजीत कदम यांच्या विजयाची हॅटट्रिक; गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष 

         जय हो......विजयी हो......@३०,०६४

 

कडेगांव प्रतिनिधी:

अत्यंत लक्षवेधी बनलेल्या २८५ पलूस- कडेगांव विधानसभा मतदार संघातून काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी ३०,०६४ मतांनी विजयी प्राप्त करून भाजपा महायुतीचे उमेदवार सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव केला.सलग तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकून त्यांनी विजयाची हॅटट्रिक करून नवा इतिहास निर्माण केला आहे.

कडेगांव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) इमारतीत एकूण २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी निकालाची घोषणा केली.

आकडे काय बोलतात ..

एकूण मतदान - २ लाख ९२ हजार ८८६,

झालेले मतदान - २ लाख ३१ हजार ४२३ (८१.०२ %)

उमेदवारांना मिळालेली एकूण मते -

डॉ.विश्वजीत कदम - १ लाख ३०,७६९   (विजयी)

संग्रामसिंह देशमुख - १ लाख ७०५

स्व.डॉ.पतंगराव कदम यांची प्रेरणा, मतदार संघात मोठ्या प्रमाणात केलेली  विकासकामे व जनतेचे आशीर्वाद याच्या बळावर ही निवडणूक जिंकली.येथून पुढेही अविरतपणे मतदार संघाच्या सर्वसमावेशक सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त करून मतदारांचे आभार मानले.

पलूस-कडेगांव विधानसभा मतदार संघातील गावागावांतील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

To Top