पलूस कडेगांवच्या जनतेचा कौल मान्य;शेवटच्या श्वासापर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी तत्पर- संग्रामसिंह देशमुखांची प्रतिक्रिया
कडेगांव प्रतिनिधी :
पलूस- कडेगांव विधानसभा मतदारसंघातील जनतेला नोकरीची खोटी आश्वासने दिल्याने आमचा निसटता पराभव झाला आहे. जनतेने दिलेला कौल मान्य असून राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे.मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने ताकतीने काम करत राहणार आहे. मतदारसंघातील १ लाखा पेक्षा अधिक मतदारांनी आमच्यावर जो विश्र्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला खरे उतरणार असून, टेंभू योजनेचे शिल्पकार स्व.आ. संपतराव (आण्णा) देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावच्या जनतेची सेवा करणार.
श्री.संग्रामसिंह देशमुख.
पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघ