Sanvad News चिरीमिरी घेऊन येणाऱ्या लक्ष्मीपुत्रांना महायुती सरकारच्या योजनांचा हिशोब सांगा - संग्राम देशमुख ; सोहोली, चिखली,अमरापूर येथे प्रचाराचा धुरळा

चिरीमिरी घेऊन येणाऱ्या लक्ष्मीपुत्रांना महायुती सरकारच्या योजनांचा हिशोब सांगा - संग्राम देशमुख ; सोहोली, चिखली,अमरापूर येथे प्रचाराचा धुरळा

 चिरीमिरी घेऊन येणाऱ्या लक्ष्मीपुत्रांना महायुती सरकारच्या योजनांचा हिशोब सांगा - संग्राम देशमुख ; सोहोली, चिखली,अमरापूर येथे प्रचाराचा धुरळा

चिखली ता कडेगांव येथे प्रचार दौऱ्यात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख नागरिकांसोबत.

कडेगाव प्रतिनिधी : 

आता निवडणूकिच्या तोंडावर काहीजण तुमच्या दारात चिरीमिरी घेऊन येतील त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊ नका. त्या लक्ष्मीपुत्रांना भाजपा महायुती सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या खात्यात किती रक्कम जमा होते याचा हिशोब सांगा. आणि मला सेवेची संधी द्या, असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले. 

सोहोली, चिखली, अमरापूर या गावात प्रचाराचा धुरळा उडत आहे. तरूणांनी हिरीरीने सहभाग घेत गावातून पदयात्रा काढल्या.संग्राम भाऊ देशमुख यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून विधानसभेत पाठविण्याचा  लाडक्या बहिणींनी संकल्प केला.

संग्राम देशमुख म्हणाले, आतापर्यंत ज्यांनी तुमची कामे केली नाहीत त्यांना तुमच्या समोर तोंड दाखवायच्या योग्यतेचे नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते वाट्टेल ते प्रयोग करतील. भावनिक बोलतील आणि चिरीमिरी घेऊन तुमच्या दारात येतील. परंतु तुम्ही त्या लक्ष्मीपुत्रांना भाजपा महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाचा हिशोब सांगा. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता दर महिन्याला एकविसशे रूपये मिळणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेचे राज्याचे आणि केंद्राचे मिळून १२ हजार रुपये येत आहेत. असा सगळा हिशोब काढला तर सरकार कुटुंबाला किती हातभार लावते याचा अंदाज येतो. परंतु कॉंग्रेसचे. लोक या सर्व योजना बंद करण्याची भाषा बोलत होते. त्यामुळे सर्व सामान्य माणसाच्या हितासाठी महायुतीचे सरकार आणा त्यासाठी मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले. 

सोहोली येथे संदीप मोहिते, हर्षल नलवडे, संभाजी मोहिते, गोरख मोहिते, शशिकांत मोहिते, सदाशिव मोहिते, शंकर मोहिते, माजी उपसरपंच सुरेश मोहिते, माजी सरपंच संतोष यादव आदी उपस्थित होते.चिखली येथे राहुल शिंदे, शंकर जाधव, जयवंत शिंदे, विजय जाधव, राजेंद्र शिंदे, शशिकांत जाधव, गणाबा शिंदे उपस्थित होते. अरापूर येथे अमरदीप मोरे , दशरथ मोरे, राकेश मोरे, आनंदराव मोरे, विनोद मोरे, सरपंच प्रकाश गडळे, प्रशांत पाटील, जीवन पवार उपस्थित होते.


 

To Top