Sanvad News महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पेन्शनर संघटनेचा जाहीर बिनशर्त पाठिंबा :अध्यक्ष धनाजी यादव

महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पेन्शनर संघटनेचा जाहीर बिनशर्त पाठिंबा :अध्यक्ष धनाजी यादव

 
महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पेन्शनर संघटनेचा जाहीर बिनशर्त पाठिंबा :अध्यक्ष धनाजी यादव

कडेगांव प्रतिनिधी:

पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४  च्या निवडणुकीत पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांना पेन्शनर संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.

 या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींचा प्रत्यक्ष त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडून विजय होण्याचा शुभमय आशीर्वाद घेऊनच त्या सर्वांचे इच्छेप्रमाणे या मतदारसंघाचा कायापालट करून या मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी आदरणीय संग्राम भाऊ उभे आहेत यासाठी यांना पेन्शनर संघटनेचा जाहीर बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे अध्यक्ष धनाजी यादव यांनी सांगितले. 

कडेगांव तालुका सर्व पेन्शनर असोसिएशन तसेच कडेगांव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्व बंधू-भगिनी आणि भक्त मंडळींचा संग्राम संपतराव देशमुख या भाजपच्या अधिकृत उमेदवारांना एकमुखाने बिन शर्ट जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी कडेगांव तालुका सर्व पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष धनाजी यादव नाना , मोहन यादव सेक्रेटरी, भिमराव यादव, जयवंत बुवा वाघमारे, नाना पाटील खेराडे, सुभाष बुवा यादव, सुखदेव आप्पा यादव, बसिरभई  मुल्लानी उपस्थित होते.




To Top