Sanvad News पलूसची स्वाभिमानी विकास आघाडी चमत्कार घडविणार ;संग्राम देशमुख यांना जाहीर पाठींबा;बुधवारी सायंकाळी पलूस मध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार

पलूसची स्वाभिमानी विकास आघाडी चमत्कार घडविणार ;संग्राम देशमुख यांना जाहीर पाठींबा;बुधवारी सायंकाळी पलूस मध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार

 
पलूसची स्वाभिमानी विकास आघाडी चमत्कार घडविणार ;संग्राम देशमुख यांना जाहीर पाठींबा;बुधवारी सायंकाळी पलूस मध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार

लूस प्रतिनिधी :

 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसूगडे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत  जाहीर पाठींबा  दिला.संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दि. १३ नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी पलूस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.उमेदवार संग्राम देशमुख व भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत पलूस येथे बैठक झाली. 

 

निलेश येसूगडे म्हणाले, पलूस शहराच्या विकासासाठी संग्राम देशमुख यांना पाठिंबा देत आहोत. ज्यांनी आमचे नेते बापूसाहेब येसूगडे यांच्या डोळ्यात पाणी आणले त्यांना आम्ही कधीच मदत करणार नाही. पलूस शहराच्या विकासाचे कै. बापूसाहेब येसूगडे यांचे पलूस शहराचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पाठिंबा देत आहोत.

 संग्राम देशमुख हे शब्द पाळणारे नेते आहेत. त्यामुळे आम्ही सुचविलेली विकास कामे ते करतील याची आम्हाला खात्री आहे. स्वाभिमानी विकास आघाडी नेहमीच भारतीय जनता पार्टी बरोबर राहीली आहे. उद्या बुधवारी सायंकाळी पलूस येथे स्वाभिमानी विकास आघाडीचा मेळावा घेऊन आम्ही संग्राम भाऊंच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत. पलूस शहरातून मताधिक्य देणार आहोत.


संग्राम देशमुख म्हणाले, आता वेळ अटी तटीची आहे. आपण सर्वांनी विचारपूर्वक आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला ही फार मोठी जमेची बाजू आहे. गेल्या कित्येक वर्षात ज्यांनी मतदार संघाचे नेतृत्व केले त्यांनी शहराचा विकास केला नाही. आता आपण सगळे एकसंघ होऊन उद्याची निवडणूक जिंकूया आणि विकासाचे नवे पर्व सुरू करूया.

यावेळी पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे शामराव ढोमके, मालोजी माने, पोपट नलवडे, कपील गायकवाड, धनाजी कुंभार, विष्णू सिसाळ, रंगराव येसूगडे, राजू माळी, राजू जाधव, राजू येसूगडे, बी. जी. कुंभार, भरत गोदील, विजय जाधव, जीवन मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



To Top