पलूस-कडेगांव विधानसभा मतदासंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.३४% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पलूस बौद्ध वसाहत येथील मराठी शाळेत जेष्ठ नागरिक जगन्नाथ घारे(वय ९५) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
पलूस प्रतिनिधी:
आज बुधवार दिनांक - २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील लक्षवेधी असणाऱ्या २८५ पलूस- कडेगांव विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ या कालावधीत वाजेपर्यंत १७.३४ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या बाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी सदर माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. १,४६,०७२ इतके पुरुष तर १,४६,७८६ इतके महिला मतदार,इतर ८ मतदार नोंद आहेत.एकूण मतदार संख्या २,९२,८६६ इतकी आहे .
चार तासाच्या टप्प्यात ३१,६७२ पुरुषांनी तर १९,११२ महिलांनी एकूण ५०,७८४ मतदारांनी मतदान केले.सदर मतदान एकूण मतदानाच्या १७.३४ % इतके झाले आहे.सकाळी ७ ते ९ या दोन तासात संथगतीने सुरू असलेले मतदान ९ नंतर गतीने सुरू आहे.