Sanvad News मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कडेगांव येथे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थ्यांची सायकल रॅली

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कडेगांव येथे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थ्यांची सायकल रॅली

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कडेगांव येथे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थ्यांची सायकल रॅली 


कडेगांव प्रतिनिधी:मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कडेगांव मधून प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व मतदार जागृती करिता पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कडेगाव येथे सायकल रॅली आयोजित करण्यात आली.तहसील कार्यालय कडेगाव येथून रॅलीस सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, सुरेश बाबा देशमुख चौक मार्गे बस स्थानक कडेगाव इथपर्यंत रॅली काढण्यात आली.मतदार जागृती रॅलीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कडेगाव मा. रणजीत भोसले साहेब ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कडेगाव मा. अजित शेलार साहेब ,स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे ,प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर सुरेश पाटील, सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी श्री महादेव माळी, श्री विश्वजीत पवार तसेच शिक्षक व महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले .

To Top