सासपडे येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कडेगांव प्रतिनिधी :
सासपडे ता. कडेगाव येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सासपडे ता.कडेगाव येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते संग्राम भोसले, चंद्रकांत भोसले, लक्ष्मण भोसले, अशोक भोसले, बाळासाहेब भोसले, सागर भोसले, दत्तात्रय भोसले, नितीन भोसले, अमित भोसले, सुधीर भोसले यांनी प्रवेश केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रनिष्ठ विचारधारेवर विश्वास ठेवत भाजपा महायुतीचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये भाजपात प्रवेश केला. या वेळी कडेगाव तालुक्यातील सासपडे गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.