मोहल्लेसे उठी एकही पुकार.. हमारे संग्रामभाऊ है पलूस- कडेगांव के आमदार ;मुस्लीम समजाचा घर टू घर प्रचाराचा झंझावात
कडेगाव प्रतिनिधी :
पलुस कडेगांव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचार करण्यासाठी मुस्लीम समाजातील कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. घर टु घर प्रचाराचा झंझावात सुरू आहे.
विरोधकांनी भाजपा व महायुती सरकारच्या विरोधात जो संभ्रम मुस्लीम समाजात निर्माण केला आहे. त्या विरोधात मुस्लिम समाजातील कार्यकर्ते घर टू घर जाऊन महायुती सरकारच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला आहे. अनेक मुस्लिम शेतकऱ्यांना विज बिल माफी झालेली आहे. कित्येक मुस्लिम युवक युवतीना स्कॉलरशिप चा लाभ मिळालेला आहे. तेच मुस्लिम युवक युवती आज यूपीएससी एमपीएससी मध्ये चमकत आहेत. अनेक मुस्लिम तरुण विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनत आहेत. हे महायुती व भाजपाचे सरकार "सबका साथ सबका विकास" करत आहे. हे सरकार मुस्लिम विरोधी असते तर या सरकारने मुस्लिम समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला नसता. मुस्लिम शेतकऱ्यांना वीजबिल माफी दली नसती. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली नसती.
कडेगाव पलूस तालुक्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख व संग्रामभाऊ देशमुख हे मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असतात. कोरोना लॉकडाऊन नंतर मोहरम सणावर प्रशासनाने बंदी घातली होती. त्यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मुस्लिम समाजातील कोणत्याही युवकावर गुन्हा दाखल करायचा असल्यास आधी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ठोस भूमिका घेतली होती. पलूस कडेगाव मध्ये कधीही हिंदु मुस्लिम दंगल घडलेली नाही. कारण या भागाचे नेतृत्व करणारे देशमुख कुटुंब हे मुस्लिम समाजाच्या पाठीमागे ठाम आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना मुस्लिम समाज बळी पडणार नसून महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मुस्लिम समाज मतदान रुपी आशीर्वाद देणार असल्याचा विश्वास आयएस ग्रुप चे संस्थापक इम्तियाज शेख यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी सभापती आशपाक पठाण,माजी उपनराध्यक्ष हाजी मूकतार पटेल, हमीद मुल्ला, गणी तांबोळी, हनीफ अत्तार,जाकिर मुल्ला, आश्रफ तांबोळी, समीर इनामदार, नईम पटेल,रियाज इनामदार, नवाज तांबोळी, सादिक इनामदार, असिफ इनामदार, वसीम इनामदार अजय जाधव, नजीर अत्तार, अमन मुल्ला, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.