राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत पलूस येथे महिला बचत गट मेळावा संपन्न
यावेळी पलूस नगरपरिषद एन.यु.एल.एम नोडल अधिकारी नम्रता लोटके यांनी उपस्थीत महिलांना मार्गदर्शन करीत महिला बचत गटांनची बांधणी बाबत चर्चा केली.यावेळी कर अधिकारी स्वाती आंबी,वसिम खाटीक,अल्ताफ मुल्ला,अर्जुन मोरे हे नगर परिषद पलूसच्या वतीने मेळाव्यास उपस्थित होते. तत्पूर्वी युवासेना पलूसच्या वतीने नगर परिषद अधिकारी यांचा सत्कार उपनगरातील कल्पना गोंदिल,संगीता मोरे,शोभा मोरे यांच्या हस्ते करीत कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. युवासेना सांगली जिल्हाप्रमुख विनायक गोंदील यांनी उपस्थितांचे स्वागत करीत शहरांतील प्रत्येक घरा घरातील महिलांनी राष्ट्रिय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत बचत गटांची बांधणी करीत बचत करावी असे उपस्थित महिलांना आवाहन केले. तसेच यासंदर्भात लागेल ती मदत युवासेना पलूस करणार असल्याचे त्यांनी सांगितले युवासेनेच्या वतीने महिला बचत गटाना अर्ज उपलब्ध करून देणे,अर्ज भरून देणे,राष्ट्रीयकृत बँकांचे खाते उघडणे कामी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले.उपस्थित महिलांनी एन.यु.एल.एम महिला बचत गट सुरू करण्यासाठी गेली एक ते दोन वर्ष सातत्याने यशस्वी पाठपुरावा केले.या कामी युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांचा सत्कार केला. कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख नसीम भाभी नदाफ,आरोग्य सेनेचे अस्लम नदाफ, युवा सेनेचे संदिप शिंदे,मयुरा गोंदिल,सीमा गोंदिल,शितल गोंदिल,विद्या मोरे,रंजना बाबर,सलीमा मुजावर,लता माने आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आभार ज्योती पवार यांनी मानले.