Sanvad News जिद्द,चिकाटी, परिश्रमाची तयारी असल्यास यश निश्चित : धनंजय देशमुख; सीमा सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे यांचा सत्कार

जिद्द,चिकाटी, परिश्रमाची तयारी असल्यास यश निश्चित : धनंजय देशमुख; सीमा सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे यांचा सत्कार

 जिद्द,चिकाटी, परिश्रमाची तयारी असल्यास यश निश्चित : धनंजय देशमुख; सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे यांचा सत्कार.  


कडेपूर प्रतिनिधी.

 एखाद्या अपयशाने न खचता ध्येय निश्‍चित करून त्यासाठी परिश्रमाची तयारी केल्यास व प्रयत्नात सातत्य असल्यास जिद्द,मेहनत व चिकाटी असेल तर कोणत्याही  क्षेत्रात यश निश्चित मिळते असे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले ते सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे याच्या सत्काराप्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये  बोलत होते. 

 यावेळी उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे, नगरसेवक निलेश लंगडे, सुधाकर चव्हाण, हणमंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यापुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की कडेगाव शहरातील संजय शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा आदित्य शिंदे यांने देशसेवेसाठी भारतीय सेनेमध्ये भरती होण्याचे ध्येय निश्चित केले होते.

आदित्यने खडतर परिस्थितीत जिद्द, चिकाटी व मेहनतीने अभयास व शारीरिक सरावात सातत्य ठेवले. त्याच्या मेहनती व कष्टाचा जिद्दीवर त्यानें हे यश प्राप्त केले असून कडेगाव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे, त्यामुळे अशा खडतर परिस्थितीत आदित्यने जे यश संपादन केले आहे,त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी अदित्य शिंदे यांचे वडील संजय शिंदे, सुधाकर चव्हाण, हनमंत शिंदे, यांच्यासह कडेगाव शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.



To Top