Sanvad News रेशीमबाग हे आम्हां स्वयंसेवकांसाठी तीर्थक्षेत्र : संग्राम देशमुख

रेशीमबाग हे आम्हां स्वयंसेवकांसाठी तीर्थक्षेत्र : संग्राम देशमुख

 रेशीमबाग हे आम्हां स्वयंसेवकांसाठी तीर्थक्षेत्र : संग्राम देशमुख 


कडेपूर : प्रतिनिधी

आपल्या सदावत्सल मातृभूमीच्या सेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे श्रद्धेय डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि प. पू. गोळवलकर गुरुजी म्हणजे आपलं उभं आयुष्य देशासाठी वाहून घेणारे महातपस्वीच... त्यांच्या प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी विचारांचं अनुकरण प्रत्येक भारतीयाने केलं पाहिजे.रेशीमबाग हे आम्हा स्वयंसेवकांसाठी तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी व्यक्त केले. ते नागपुर  रेशीमबाग येथील दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या स्मृतींचे दर्शन घेत त्यांच्याचरणी नतमस्तक झाले यावेळी ते बोलत होते. पुढे देशमुख म्हणाले की रेशीमबाग ही राष्ट्रपुरुषांची कर्मभूमी आहे, देशाला परमवैभवापर्यंत घेऊन जाण्यासाठी व्रतबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले. 




To Top