कुंडल येथील क्रांतिअग्रणी सेवकांची पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
कुंडल प्रतिनिधी:क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या; कुंडल च्या वतीने नूतन वर्ष २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
११२९ सभासद व १७ कोटींहून अधिक ठेवी असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास २० कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्मचारी व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या योगदानातून संस्थेची अगदी उल्लेखनीय अशी कामगिरी असून येणाऱ्या वर्षात अधिकाधिक प्रगती होईल, असा विश्वास यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केला.
सदर प्रकाशन सोहळ्यास कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख, सर्व खातेप्रमुख, संस्थेचे चेअरमन बाळासो लाड, व्हा. चेअरमन जितेंद्र पाटील, सचिव संभाजी पवार, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी तसेच हितचिंतक उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जितेंद्र पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे राजकुमार संकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.