श्री.दत्त जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र औदुंबर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
अंकलखोप प्रतिनिधी:
अंकलखोप - औदुंबर (ता. पलुस ) येथील श्री. दत्त जयंती निमित्त श्री दत्त सेवाभावी मंडळ (ट्रस्टने) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून ट्रस्ट तसेच भिलवडी पोलिस प्रशासनाने तयारीवर अंतिम हात फिरवला आहे.
शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ हा उत्सवाचा प्रधान दिवस आहे.पहाटे ५ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरूवात होत असून, पहाटे ५ ते ६. ३० वा. काकड व मंगल आरती, सकाळी ६. ३० ते ११. ३० अभिषेक, दुपारी १ पर्यत महापुजा, नैवद्य, व महाआरती, महाप्रसाद, दुपारी ४ ते ५ .३० वा. श्री दत्तगुरूंच्या जन्माचे वासुदेव जोशी यांचे किर्तन होईल. सांयकाळी ५ .३० वा श्री दत्तगुरूचा जन्म काळ सोहळा सुरू होईल. रात्री ७ .३० ते ९ . ३० वा. धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली, करूणा त्रिपादी होईल.
रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ उत्सवाचा चतुर्थ दिवस प.५ ते ६. ३० वा. काकड व मंगल आरती, सकाळी ६. ३० ते ११. ३० वा. अभिषेक, दुपारी १ पर्यत महापुजा, महानैवद्य. दुपारी १ ते ३ वा. या वेळेत श्री दत्त सेवा भावी ट्रस्ट, औदुंबर - अंकलखोप यांच्यावतिने मंदीर परिसरात महा प्रसाद होणार आहे. तर पुजारी संदीप जोशी यांनी त्यांच्या घरी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सांयकाळी ६ ते ७ : ३० माऊली व आनंदी भजनी मंडळ यांचे भजन, रात्री १२.१५ ते १.१५ वा. धुपारती, पालखी, मंत्रपुष्पांजली.
सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी पहाठे ५ ते ६.३० वा. लळीताचे किर्तन वासुदेव जोशी, नितीन गुरव, संतोष जोशी यांचे होईल. सकाळी ६. ३० वा. काकड आरती, महापुजा, मंगल आरती नंतर श्री दत्त जन्मोत्सवाची समाप्ती होईल.
स्टॉल सजले....
दत्त जयंती उत्सवा निमित्त भिलवडी आष्टा रोडलगत असणाऱ्या स्वागत कमानी पासून दत्त मंदिराच्या दिशेने उदी खेळणी,मिठाई,विविध वस्तूंच्या विक्रीचे व खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.