Sanvad News हिंगणगाव बुद्रुक येथील सुवर्णमहोत्सवीपारायण सोहळ्याला अपर्णाताई देशमुख यांची भेट

हिंगणगाव बुद्रुक येथील सुवर्णमहोत्सवीपारायण सोहळ्याला अपर्णाताई देशमुख यांची भेट

 हिंगणगाव बुद्रुक येथील सुवर्ण महोत्सवीपारायण सोहळ्याला अपर्णाताई देशमुख यांची भेट 


कडेगांव प्रतिनिधी :

हिंगणगाव बुद्रुक ता. कडेगाव येथे ब्रह्मचैतन्य सदगुरू नारायण स्वामी महाराज यांच्या जिवंत समाधीस्थळी हिंगणगाव बु. ग्रामस्थांच्यावतीने प्रत्येक वर्षी पारायण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या पारायण सोहळ्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याने सुवर्णमहोत्सव निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, रथउत्सव मिवणुक, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रथ मिरवणूक मार्गावर महिलानी रांगोळी काढून फुलांनी सजावट करून रथाचे स्वागत केले.या रथोस्तव व पारायण समाप्ती सोहळ्याला ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख यांनी भेट दिली.यावेळी अपर्णाताई देशमुख यांनी त्यांनी ब्रह्मचैतन्य सदगुरू नारायण स्वामी महाराज समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पवित्रस्मृतिस पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. 

         यावेळी सुरेखा कदम, दिपाली कदम, मृणाली कदम, माधवी कदम, सुभद्रा कदम, सविता कदम,अर्चना कदम, कुसुम कदम, राधिका पवार, ज्येष्ठनेते हणमंतराव कदम,आनंदराव यादव,वैभव कदम, शिवाजी कदम, नवनाथ शिंदे, संजय यादव, सुरज कदम, भगवान कदम,तानाजी खवळे, कृष्णत खवळे,सिद्धार्थ माने, संदीप महाडिक,संतोष कदम, दत्तात्रय कदम, तुकाराम कदम, मयूर कदम, सागर कदम, दीपक पवार, शिवाजी कदम, भास्कर कदम, रमेश कदम, सुरेश कदम, धर्मेंद्र चव्हान, धर्मा कदम, अमोल माने, शिवाजी कदम, दिलीप कदम, विकास कदम,संकेत माने, सोन्या जाधव यांच्यासह महिला, अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top