Sanvad News बुरुंगवाडी ते औदुंबर पायी दिंडी सोहळा उत्साहात

बुरुंगवाडी ते औदुंबर पायी दिंडी सोहळा उत्साहात

 बुरुंगवाडी ते औदुंबर पायी दिंडी सोहळा उत्साहात


भिलवडी प्रतिनिधी:

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात बुरुंगवाडी ते औदुंबर पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. बुरूंगवाडी ता.पलूस येथील सद्गुरू ब्रम्हानंद महाराज मठातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.हे पायी दिंडी सोहळ्याचे २५ वे वर्ष आहे.बुरूंगवाडी ते धनगांव,भुवनेश्वरवाडी,भिलवडी ते श्री क्षेत्र औदुंबर या मार्गाने दुपारी दिंडी औदुंबर येथे पोहोचली.सर्व भाविकांनी दत्तमहाराजांचे दर्शन घेऊन  औदुंबर,भिलवडी,माळवाडी,खंडोबाची वाडी,भिलवडी स्टेशन ते बुरुंगवाडी असा परतीचा प्रवास केला.गावागावातील नागरिक व महिलांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले.सद्गुरू ब्रह्मानंद चॅरिटेबल ट्रस्ट,भजनी मंडळ,ग्रामस्थ,महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाला. ब्रह्मानंद महाराज मठात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.महाप्रसाद वितरण करून दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

To Top