धनगांवच्या श्रद्धा यादव ने वृक्षारोपण करून केला आपला वाढदिवस
भिलवडी प्रतिनिधी:
कु.श्रद्धा दिलीप यादव हीने आपला वाढदिवस केक कापून नव्हे तर वृक्षारोपण करून साजरा केला.वाढदिवसाच्या निमित्ताने श्रद्धाने खूप छान विचार करून निसर्गाप्रती असणारे प्रेमआपल्या वडिलांना सांगितले व आपल्या वडिलांना माझ्या वाढदिवसाला केक नको मला एक झाड द्या मी ते झाड आपल्या गावात लावण्यासाठी ग्रामपंचायतीला देणार आहे या तिच्या मागणीला तिचे वडील दिलीप दत्तात्रय यादव यांनी लगेच होकार दिला व आपल्या मुलीला एक झाड आणून दिले ते झाड त्यांनी ग्रामपंचायतीला दिले व त्याचे वृक्षारोपण ही केले तिच्या या विचाराबद्दल सर्वांना अभिमान वाटला त्या अनुषंगाने तिला ग्रामपंचायतीच्या वतीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी धनगावचे सरपंच संदीप यादव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे , तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य काजल मदने, माणिक तावदर,कूशिनाथ यादव अधिक मोटकट्टे, बाळासो कुर्लेकर,, सदाशिव साळुंखे, संभाजी साळुंखे, दीपक साळुंखे,सुधीर साळुंखे, अमोल बोंडरे, बबलू मोटकट्टे , जयसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .