Sanvad News जिल्हा परिषद मॉडेल स्कूल ब्रम्हनाळ मध्ये देव दीपावली निमित्ताने दीपोत्सव व चांदणी भोजन उपक्रम उत्साहात साजरा

जिल्हा परिषद मॉडेल स्कूल ब्रम्हनाळ मध्ये देव दीपावली निमित्ताने दीपोत्सव व चांदणी भोजन उपक्रम उत्साहात साजरा

 जिल्हा परिषद मॉडेल स्कूल ब्रम्हनाळ मध्ये देव दीपावली निमित्ताने दीपोत्सव व चांदणी भोजन उपक्रम उत्साहात साजरा


भिलवडी प्रतिनिधी:

ब्रह्मनाळ ता.पलूस येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल ब्रम्हनाळ या शाळेत देव दीपावली निमित्त दीपोत्सव चांदणी भोजन व शेकोटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात सर्वप्रथम दिवे व पणत्या प्रज्वलित करून शाळेच्या परिसरात लावण्यात आल्या. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पणत्या, दिवे,तेल,वाती प्रज्वलित करून शाळा व शाळेचा परिसर प्रकाशमय करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.आण्‍णासो गावडे यांच्या शुभहस्ते शेकोटी प्रज्वलित करण्यात आली. सौ.जयश्री गुरव मॅडम यांनी शेकोटी प्रार्थना सांगितली. शेकोटी भोवती विद्यार्थ्यांनी फेर धरून विविध गाण्यांचे गायन केले. त्यानंतर सर्व मुलांनी चांदणी भोजन चांदण्याच्या शितल प्रकाशामध्ये केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत साळुंखे यांनी देव दीपावली सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच आकाश निरीक्षण करणे नक्षत्र पाहणे व दिशांचे ज्ञान याबाबत माहिती दिली.शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री मनोज कुमार मुळीक यांनी विद्यार्थ्यांना विविध नक्षत्रे यांच्या विषयी माहिती सांगितली.


विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येने माता पालक ही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी एकत्रित बसून चांदणी भोजनाचा आस्वाद घेतला. 

अशाप्रकारे सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. आण्‍णासो गावडे उपाध्यक्ष सौ.दिपाली बंडगर  तसेच ब्रम्हनाळ गावचे उपसरपंच सुभाष वडेर आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस व प्रमुख पाहुणे सौ जयश्री गुरव व सौ पुनम कारभारी या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहित गुरव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार श्री. मनोज कारभारी सर यांनी मानले.

To Top