संविधानातील मूल्ये जनमानसांत रुजविणे गरजेचे - ॲड.असीम सरोदे ; क्रांतिअग्रणी व्याख्यानमालेस प्रारंभ
ते कुंडल (ता.पलूस) येथे 'क्रांतिअग्रणी' व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना 'संविधानिक नैतिकता व लोकशाही' या विषयावरती बोलत होते. अध्यक्षस्थानी उदय लाड होते, तर यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार अरूण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड इ. मान्यवर उपस्थित होते.
ॲड. असीम सरोदे पुढे म्हणाले, आज निवडणूक आयोग सुद्धा स्वायत्त संस्था राहिली नाही. संविधानिक नैतिकता टिकली, तरच लोकशाही टिकणार आहे. भारतामध्ये फक्त संविधान चालते. संविधानचा जीवनावश्यक विचार राजकारणातून वाहून जावू लागला आहे. कट्टरवाद हा संविधानाला मुळीच मान्य नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानात आहे, संविधानातील मुल्ये जनमाणसात रूजणे गरजेचे आहे.
यावेळी मामासाहेब पवार सत्यविजय बॅकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, क्रांतीचे उपाध्यक्ष दिंगबर पाटील, कुंडलचे उपसरपंच अर्जुन कुंभार, चंद्रकांत रोकडे, कॉ. धनाजी गुरव, श्रीकांत लाड, रणजित लाड, विक्रांत लाड, सर्जेराव पवार, प्राचार्य आर. एस. डुबल, चंद्रकांत जाधव, जयवंत आवटे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्योती जाधव, गिताजंली एडके त्याचप्रमाणे प्रास्ताविक प्रशांत आवटे यांनी तर पाहुण्यांचा परिचय नितीन जाधव व आभार संदिप डुबल यांनी मानले.