ग्रीन पॉवर शुगर्सतर्फे ऊस तोडणी कामगारांचे आरोग्य तपासणी.
कडेपूर प्रतिनिधी परवेझ तांबोळी
ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सूचनेनुसार ऊस तोडणी कामगार, वाहतूकदारांची आरोग्य तपासणी कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र पळशी (औंध) येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ऊस तोडणीमजूर, स्त्रिया, गरोदर स्त्रिया, लहान बालके, ड्रायव्हर अश्या १०५ ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशनानुसार करण्यात आली. ऊस गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये ऊस तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांचे हंगाम कालावधी मध्ये तीन टप्प्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची महिती यावेळी कारखाना प्रशासनाने दिली.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत जाधव, जनरल मॅनेजर(केन) मनोहर मिसाळ, प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव, लेबर ऑफिसर विनोद यादव, ऊसविकास अधिकारी अमोल साठे, हेड टाईम कीपर संतोष जाधव,सुरक्षा अधिकारी धनाजी आमले,प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे आरोग्य अधिकारी डॉ. संकेत मोरे, आरोग्य सहाय्यक डॉ.घाडगे, आरोग्य सेविका, सेवक, आशावर्कर, मदतनीस यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.