क्रांती कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर
कुंडल प्रतिनिधी:
आपल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकरी साखर कारखाना लि. कुंडलच्या सह-वीजनिर्मिती प्रकल्पास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे मार्फत हंगाम २०२३-२४ करीता दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसेच वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार सुद्धा जाहीर झाला असल्याची माहिती चेअरमन शरद भाऊ लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आमदार अरुण आण्णा लाड,उपाध्यक्ष दिगंबर पाटील,कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे,सर्व संचालक उपस्थित होते.
कारखान्यातील पुढील तीन अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट को -जन मॅनेजर - संदिप भोजे,उत्कृष्ट इन्स्ट्रुमेंट मॅनेजर - शिवाजी साळुंखे,उत्कृष्ट इलेक्ट्रिकल मॅनेजर - किरण साजणे.
८७ बार प्रेशर खाली बॉयलर गटातून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग,हितचिंतक यांच्या योग्य सहकार्य,कुशल व्यवस्थापन व समन्वयामुळे हा बहुमान प्राप्त झाला असून त्या सर्वांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.