खाजगी मराठी प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव उत्साहात
भिलवडी प्रतिनिधी:भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला.सरगम ज्वेलर्सचे मालक जगदीश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.मनिषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदानाचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडरांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.सौ.प्रगती भोसले यांनी संविधान दिनानिमित्त माहिती सांगितली.यावेळी विद्यालयास ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट टी.व्ही.भेट देणार असल्याचे जगदीश माळी यांनी जाहीर केले.
प्रास्ताविक व स्वागत क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी केले.सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले.सौ.संध्याराणी मोरे यांनी आभार मानले.यावेळी विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे, स्वाती भोळे,प्रियांका आंबोळे,सारिका कांबळे,सौ.विद्या नाईक आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.तीन दिवस सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात विद्यार्थी सहभागी झाले.