Sanvad News गुरूजन हो,चलो घारेवाडी...हृदयातंल संमेलन आपणांस साद घालतंय..

गुरूजन हो,चलो घारेवाडी...हृदयातंल संमेलन आपणांस साद घालतंय..

 गुरूजन हो,चलो घारेवाडी...हृदयातंल संमेलन आपणांस साद घालतंय..


इंद्रजित देशमुख (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गरम्य अशा शिवम् आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान,घारेवाडी, ता. कराड,जि. सातारा येथे शिक्षक व शिक्षणप्रेमींसाठी दि.३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी या कालावधीत गुरुजन हृदय संमेलन-२०२४ संपन्न होत आहे.या मध्ये गुरुजन व शिक्षणप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांचे वतीने करण्यात येत आहे.

आनंद लुटूया शैक्षणिक विचारांचा...

शिबिरासाठी मार्गदर्शक-महेंद्रभाई सेठिया (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञज्ञान प्रबोधिनी पुणे),अतुल देसाई(बालहक्क कार्यकर्ते,संपादक- संगोपन मासिक कोल्हापूर), संदीप वाकचौरे(लेखक व शिक्षणतज्ज्ञ),संदीप पवार(राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षकजरेवाडी,बीड), सागर बगाडे(राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक कोल्हापूर),नितीन चंदनशिवे(सुप्रसिद्ध कवी कवठेमहांकाळसांगली), रोहित शिंगे(सुप्रसिद्ध कवी रुकडी),हेरंब कुलकर्णी(सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ,लेखक), किरण केंद्रे(संपादक किशोर मासिक बालभारती पुणे) आदी दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.इंद्रजित देशमुख (काकाजी)संस्थापक - शिवम् आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान,घारेवाडी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप होणार आहे.शिक्षकांसाठी गटचर्चा, स्वतःची प्रयोगशीलता मांडणेसाठी आदी भरगच्च असे कार्यक्रम होणार आहेत.गेली सहा वर्षे राज्यभरातील हजारो शिक्षकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.यंदाच्या वर्षी ही मोठ्या प्रमाणात उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

ऑनलाईन नावनोंदणी आवश्यक लिंक

https://www.shivampratishthan.org/Events/Register?eventId=30026

सर्व शिक्षकांसाठी निवास व भोजन व्यवस्था आहे.महिला शिक्षिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.



To Top