पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल अँड ज्युनि.कॉलेज पलूस मध्ये 76 वा ध्वजारोहण व फूड फेस्टिवल उत्साहात साजरा
पलूस प्रतिनिधी:
मदरसा हजरत अली बिन अबी तालिब रजी पलूस संस्थेचे डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल अँड ज्युनि.कॉलेज पलूस मध्ये ध्वजारोहण व फूड फेस्टिवल कार्यक्रम उत्साहात पार पडला.ध्वजारोहण संस्थेचे नाजीम मुफ्ती रफअत अली साहब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किर्लोस्करवाडीचे उद्योजक हाजी मुनिर भाई मगदूम हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पलूस मदरसाचे नाजीम मीर रफअत अली साहब हे होते.
यावेळी कार्यक्रमासाठी हाजी गफूर भाई बांबवडे,जहांगीर भाई बांबवडे,नजीर भाई राधानगरी,पै.कादर भाई पटेल दुधारी ,मदरसा नाजिमे तालिमात कारी जरीफ साहब हे अतिथी उपस्थित होते. त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यानी धाडसी मानवी मनोरे यांचे उत्तम प्रात्यक्षिक सादरीकरण केले. यासाठी प्रशालेचे शिक्षक बी.एम.नदाफ सर यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले.तर मुलींनी ध्वजाचे तीन रंग दर्शवणाऱ्या तिरंगा कवायतीचे सुंदर सादरीकरण केले व उपस्थितांची वाहवा मिळवली.
यावेळी पलूस मदरसाचे नाजीम व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती रफअत अली साहब म्हणाले कि प्रत्येक देशाच्या प्रत्येक समूहातील लोकांनी देशाच्या संविधानाचे पालन केले पाहिजे .संविधानाचे वाचन केले पाहिजे व संविधानाचे रक्षण केले पाहिजे.ध्वजरोहणाच्या कार्यक्रमानंतर प्रशालेतर्फे फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.फूड फेस्टिवलचे उद्घाटन प्रसिद्ध करियर कौन्सलर व प्लेसमेंट ऑफिसर प्रा.तोहीद मुजावर यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पलूस नगरपरीषदेचे नगरसेवक विशाल भैय्या दळवी,संतोष दळवी पलूस,मुझम्मिल भाई नदाफ सांगली,पलूस चे प्रसिद्ध उद्योजक इसाक शेख,रशीद भाई पट्टेकरी भिलवडी ,सलीम भाई मुल्ला बांबवडे,जफर भाई मुजावर बुर्ली,हाफिज सद्दाम पलूस,बाळासाहेब चोपडे सर,विकास कांबळे सर हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फारूक मोमीन साहेब यांनी विशेष भेट दिली व मुलांना शाबासकी दिली.
त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी फूड फेस्टिवल च्या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या जवळपास 24 विविध खाद्यपदार्थांच्या स्टोल ना भेट दिली व खाद्यपदार्थांची चव चाखली व मुलांचे कौतुक केले. यानंतर उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, पालक,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फूड फेस्टिवल मधील पदार्थांचा,थंड पेयांचा आस्वाद घेतला.फूड फेस्टिवल साठी समीर आगा सर यांनी विशेष परिश्रम घेतले व नेटके नियोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आसिफ शेख सर व खुदबुद्दीन मुजावर सर यांनी केले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व उस्ताद,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.