Sanvad News चांगला माणूस घडविणे हे शिक्षणाचे ध्येय - शरद जाधव; न्यू इंग्लिश स्कूल उपळावीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

चांगला माणूस घडविणे हे शिक्षणाचे ध्येय - शरद जाधव; न्यू इंग्लिश स्कूल उपळावीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 चांगला माणूस घडविणे हे शिक्षणाचे ध्येय - शरद जाधव ;  न्यू इंग्लिश स्कूल उपळावीचे  वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


तासगांव संवाद न्यूज प्रतिनिधी 

केवळ पुस्तकी कीडे नव्हे तर चांगला माणूस घडविणे हे शाळा व शिक्षणाचे ध्येय आहे. न्यू इंग्लिश स्कूल उपळावी ही सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना असामान्य बनवून जगणं शिकविणारी शाळा असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.

बौद्ध शिक्षण प्रसारक मंडळ उपळावी संचलित न्यू इंग्लिश स्कूल उपळावी,ता. तासगांव यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व इयत्ता १० वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभकार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बी. एस.पाटील (भाऊ) होते.

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. मी या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे.बौद्ध शिक्षण प्रसारक मंडळ व न्यू इंग्लिश स्कूल प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करते. विद्यार्थी मित्रांनो शाळेतून चांगले संस्कार घेऊन बाहेर पडा व नेहमी सत्याची बाजू घ्या असे आवाहन बी.एस.पाटील (भाऊ) यांनी यावेळी केले.


प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांचे विद्यार्थी पालकांसाठी दिलेल्या व्याख्यानास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने साकारलेल्या झेप या मासिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात  आले.गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सायंकाळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. उपळावी ग्रामपंचायतीच्या  सरपंच सौ. आशाराणी कदम, सांगली अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधिक्षक उमेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात  आले. उपसरपंच विश्वनाथ क्षीरसागर,बौद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक रामचंद्र शिंदे,अध्यक्ष विजय पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी.आर.पाटील,सचिव अशोक शिंदे, संचालक शकुंतला शिंदे, शंकर शिंदे, धोंडीराम चव्हाण, वसंत पाटील,श्रीकांत पाटील,विलास पाटील, विश्वास शिंदे,डॉ.गणेश पाटील सर्व पदाधिकारी,सिध्देश्वर विकास सोसायटीचे चेअरमन विनायक शिंदे, व्हा.चेअरमन शरद पवार, खंडेराव ठोंबरे, सूरज गावडे, नवनाथ चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक रामलाल कोकणी,नितीन यादव,पल्लवी शिंदे,महेश सोलापूरे, सुषमामाने, भाग्यश्री शेंडगे, राजाराम सिद्ध,संदिप नलवडे, नामदेव मडके,शिवाजी शिरतोडे आदींनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले.

To Top