Sanvad News पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल अँड ज्युनि.कॉलेज मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

पलूस मदरसा डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल अँड ज्युनि.कॉलेज मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

 पलूस मदरसा डॉ. झाकीर हुसेन हायस्कुल अँड ज्युनि. कॉलेज  मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न


पलूस संवाद न्यूज प्रतिनिधी:

मदरसा हजरत अली बिन अबी तालिब रजी पलूस संस्थेचे डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल अँड ज्युनि.कॉलेज पलूस मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जोशात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे नाजीम मुफ्ती रफअत अली साहब हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून MM ग्रुप तासगावचे चे अध्यक्ष मंजूर मुल्ला,ग्रुपचे सदस्य ताहीर मोमीन,हसन ढालाईत,वाहीद मुल्ला,जलील आगा मुल्ला,वासिम बेंद्रे,मुदस्सर मुल्ला,सद्दाम मुल्ला,आबिद शेखानी,वासिम नेर्लेकर,उसामा मोमीन तसेच कादर भाई पटेल,हाफिज सद्दाम मुल्ला,कारी जरीफ साहब ,मुफ्ती मोहम्मद साहब हे उपस्थित होते. 


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मुलांना संभोधित केले व खेळाचे महत्व सांगितले.यानंतर पाहुण्यांच्या शुभहस्ते विविध खेळांचे उद्घाटन करण्यात आले.तदनंतर प्रशालेचे शिक्षक आरीफ लतीफ सरांनी तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन पाहुणे व उपस्थितांना सांगितले.  यामध्ये कबड्डी ,क्रिकेट,व्हॉलीबॉल,खो-खो या सांघिक खेळाबरोबरच लांब उडी,उंच उडी,100 मी.,200 मी.धावणे, गोळाफेक, थाळीफेक असे मैदानी खेळ व फनी गेम्स होणार असल्याचे ते म्हणाले.मदरसा नाजीम मुफ्ती रफअत अली साहब व प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख  सर यांच्या मार्गदर्शनाखाली  बी.एम.नदाफ सर व आरिफ लतीफ सर यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक आसिफ शेख सर  यांनी केले तर आभार युसूफ शेख सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व उस्ताद,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






To Top