पलूस सहकारी बँकेने पार केली कोटीच्या कोटी उड्डाणे ; हजार कोटीच्या व्यवसायाचे उदिष्ट सफल - वैभवराव पुदाले
पलूस संवाद न्यूज प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर समजल्या जाणा-या व रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता करणा-या पलूस सहकारी बँकेने नुकताच रू. १००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असलेची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन वैभवराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या बँकेच्या ठेवी रू ५८२ कोटीपेक्षा अधिक व कर्जे रू. ४१८ कोटीपेक्षा अधिक झालेल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. बँकेच्या सध्या २४ शाखा असून लवकरच सांगोला, टेंभुर्णी, नातेपुते व वाई या चार ठिकाणी सर्व सोईनियुक्त नवीन शाखा सूरू करीत असलेची माहीती यावेळी त्यांनी दिली.
बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार कर्जदार ग्राहक व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच व त्यांनी बँकेवर दाखवलेला विश्वास व पाठींवा यामुळेच सदर उद्दीष्ठ पुर्ण झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करत यापुढेही असाच पारदर्शक कारभार केला जाईल व बँकेची प्रगतीची घौडदौड अशीच सुरू राहिल असे मत यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
संचालक बजरंग सुर्यवंशी जगदीश मोहोळकर, शिवप्रसाद शिंदे, लालासाहेब संकपाळ ,चंद्रकांल गोंदील, ईश्वर सिसाळ,पुष्कराज पवार,अनिल माने,दिलीप पाटील,अशोक माने, विनय निकम, नितीन खारकांडे, मनोहर बुचडे ,प्रकाश भोरे ,नितीश शहा , अश्विनी गोंदील , मेघा येसुगडे तसेच मुख्य कार्यकारी अअधिकारी अनिल घारे ,वरिष्ठ अधिकारी सुहास सुर्यवंशी,राजू जाधव, अतुल कुलकर्णी, सर्व शाखाधिकारी, जेष्ठ सभासद, ग्राहक व बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते. यावेळी केक कापून, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.