Sanvad News राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या उपस्थितीत ४ जानेवारीला हरिपूर हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या उपस्थितीत ४ जानेवारीला हरिपूर हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांच्या उपस्थितीत ४ जानेवारीला हरिपूर हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम 


हरिपूर प्रतिनिधी : येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली, संचलित- श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलचे 'वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण' समारंभ शनिवार दिनांक-४ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. दुपारी ठीक- ३ वाजता आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून, यावर्षीचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी कलाशिक्षक मा. सागर बगाडे हे उपस्थित राहून; विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पारितोषिक वितरण करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.ॲड.जी.आर. कुलकर्णी हे आहेत.

       सागर बगाडे हे कोल्हापूर येथे.... कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून; ते उत्तम नृत्य दिग्दर्शक, लेखक, कवी, निर्माता, संवादक, चित्रकार, सामाजिक जाणीव जागृतीकार आहेत. एक अनाथ बालक ते उत्तम नृत्य दिग्दर्शक असा त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कला सादरीकरण,परदेशदौरे त्यांनी केले आहेत. विविध विश्वविक्रमही त्यांचे नोंदले गेले आहेत. अंध, अपंग, मूकबधिर, झोपडपट्टी , वंचित,अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सामाजिक कार्य अविरतपणे ते करतायहेत.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक  कार्याची दखल घेऊन ते अनेक पुरस्काराचे  मानकरी  ठरले आहेत. ५ सप्टेंबर २०२४ रोजी 'शिक्षक दिनी' दिल्ली येथे मा.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे हस्ते त्यांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. या स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री.डी. बी. पवार, कार्याध्यक्ष पूजा पाटील व संयोजक विठ्ठल मोहिते यांनी केले आहे.


To Top