पलूस येथील श्री चौंडेश्वरी पतसंस्थेचा कॅलेंडर प्रकाशन समारंभ उत्साहात
पलूस प्रतिनिधी:
पलूस येथील श्री चौंडेश्वरी पतसंस्थेचा कॅलेंडर प्रकाशन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी डॉक्ट्रेट पदवी मिळालेबद्दल डॉ बाळासाहेब चोपडे सर, तसेच कु.अमृता राजेंद्र फाळके हिची CISF मध्ये निवड झालेबद्दल संग्रामभाऊंच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.संग्रामभाऊंनी बुचडे व देशमुख कुटुंबीयांचे तीन पिढ्यामधील आठवणींना उजाळा दिला.
पतसंस्था,हॉस्पिटल,प्रतिष्ठान,फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारासाठी लागणारी शासकीय स्तरावरील मदतीचे आश्वासन दिले.या कार्यक्रम प्रसंगी ॲड.सुरजितसिंह भाई चव्हाण,निलेश(भैय्या) येसुगडे,रावसाहेब गोंदील,सयाजी(आबा) घोरपडे,राजेंद्र बर्गे,नगरसेवक दिलीप जाधव,कपिल गायकवाड,बोधिसत्व माने,संजय परांजपे,गुंडाभाऊ पाटील,अविनाश बुचडे,शशिकांत रेपाळ,ॲड प्रविण लाड, जी.आर.पाटील,संजय गोंदील,पिंटूभाऊ मोरे,शरदभाऊ सिसाळ,सुनील रेपाळ,दिलीप म्हेत्रे,नितीन खारकांडे,सागर सुतार,विशाल चव्हाण,ऋषिकेश सोनवणे,संकेत बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणात उद्योगसमूहाबद्दल गौरवोद्गार काढले.उद्योगसमूहाचे संस्थापक सूर्यकांतकाका बुचडे यांनी संग्रामभाऊंचा सत्कार केला.संस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे यांनी सर्व उद्योगसमूहाची माहिती दिली.कार्यक्रमाचे स्वागत व्हाईस चेअरमन सुरेश खारकांडे,प्रास्ताविक संचालक विशाल म्हेत्रे यांनी केले तर आभार प्रमोद बुचडे यांनी मानले.