उद्याच्या सुखदायी भविष्यासाठी सरत्या वर्षा सोबत व्यसनांनाही बाय बाय करा - सुभाष कवडे यांची भावनिक साद ; भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात दारू नको दूध प्या उपक्रम
भिलवडी प्रतिनिधी:
मित्र हो उद्याच्या सुखदायी भविष्यासाठी सरत्या वर्षा सोबत व्यसनांनाही बाय बाय करा अशी भावनिक साद प्रसिद्ध कवी,साहित्यिक सुभाष कवडे यांनी घातली.३१ डिसेंबर रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने "दारू नको दूध प्या " या योजनेअंतर्गत आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे होत.
यापुढे बोलताना सुभाष कवडे म्हणाले की, आधुनिक युगामध्ये माणसं स्वतःला सुधारायचे सोडून व्यसनांच्या आहारी जात आहेत.सुखी जीवन जगायचे असेल तर व्यसनांना दूर करा.सुसंगत मैत्री,सदाचार आणि सुविचार यांचा अंगीकार केल्यास सुंदर जीवन जगता येईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर वठारे म्हणाले की, व्यसनामुळे केवळ शरीराचीच नव्हे तर मनाची हानी होते आणि मनाची हानी झाली की घरदार,समाज,सगे सोयरे या सर्वांपासून ती व्यक्ती दूर जाते आणि एका तणावाखाली जगते. म्हणून व्यसनांना दूर सारा आणि चांगले आयुष्य जगा.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील,महाविद्यालयाचेप्राचार्यडॉ.दीपकदेशपांडे,प्रा.एस.एस.पाटील,डॉ.व्ही.एस.विनोदकर,डॉ.एस.डी.कदम उपस्थित होते .स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले.सूत्रसंचालन कु.अवंतिका स्वामी व हेमा सुपणेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.एस. एस. पाटील यांनी करून दिला. तर आभार डॉ.व्ही.एस. विनोदकर यांनी मानले.