परिश्रमाला आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चित यश - शरद जाधव;महाराष्ट्र रत्न वि.स.पागे विद्यानिकेतन मध्ये बारावी विद्यार्थी शुभचिंतन कार्यक्रम
तासगांव प्रतिनिधी:
अभ्यासातील सातत्य,वेळेचे योग्य नियोजन घेऊन केलेल्या परिश्रमाला आत्मविश्वासाची जोड दिल्यास तुम्हाला निश्चित यश प्राप्त होईल असे आवाहन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.
जीवन शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्ररत्न विठ्ठल सखाराम पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय तासगांव येथे आयोजित इयत्ता बारावी विद्यार्थी शुभचिंतन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एल. डी.म्हेत्रे होते. तासगांव नगरपरिषदेचे माजी अधिक्षक विलास भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की,शिक्षणातून मानवाचा सर्वांगिण विकास होतो,नोकरी मिळविण्याच्या हेतूने नव्हे तर आईवडिलांची स्वाभिमान उंचाविण्यासाठी शिका.यशाला कोणताच शॉर्टकट नसतो. मोबाईल काळाची गरज बनला असला तरीही त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवा.विद्यार्थिनी कु.यासिन हारकरे, प्रा.सौ. व्ही. व्ही.म्हेत्रे,सौ.पी.एच.पाटील आदींनी विद्यालयाविषयी मनोगते व्यक्त केली.
प्राचार्य एस.आर.सानप यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.सौ.एम.एम.पाटील,सौ.एस. टी.माळी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.पी.व्ही.जाधव यांनी आभार मानले.यावेळी उपप्राचार्य आर.पी.सावंत,ए.आर.पाटील, ए.आर. माळी,एम. ए. मळणगांवे,सचिन पाटील आदी उपस्थित होते.