Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.

 खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.


भिलवडी प्रतिनिधी:

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संभाजी (नाना) सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले,महावीर वठारे( गुरुजी),चंद्रकांत पाटील,सदाशिव तावदर, प्रा.धनंजय पाटील,संस्थेचे सचिव मानसिंग हाके, प्रा .मनिषा पाटील,प्रा.महेश पाटील,प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे,मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,सुचेता कुलकर्णी,श्रेयस पाटील,रोहित नलवडे आदी.संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सौ. संध्याराणी मोरे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी, डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी,सेमी इंग्लिश स्कूल भिलवडी चे सर्व शिक्षक, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



To Top