सरपंच सौ.सीमा शेटे यांचा राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्काराने सन्मान
भिलवडी प्रतिनिधी
अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सीमा विनायक शेटे यांना प्रदान करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. सौ. सीमा शेटे यांनी महिला संघटन,सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात केलेले कामकाज उल्लेखनीय असे आहे.त्यांनी सेवाभावी पद्धतीने केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते केनेथ कीर्तीजी, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नितीन कुमार भरगुडे, यशोदा विद्यापीठाचे प्रशिक्षक विवेक गुरव, सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासनाधिकारी मनीषा खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराने सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असून भविष्यात समाज हितासाठी सेवाभावी वृत्तीने विविध प्रेरणादायी असे उपक्रम राबवित राहणार असल्याचे मनोगत सरपंच सीमा शेटे यांनी व्यक्त केले. सरपंच सीमा शेटे यांच्या गौरवा बद्दल भिलवडीचे युवक नेते माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच मनोज चौगुले, बाळासो मोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.