Sanvad News पलूस तालुक्यात सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भाजप भक्कम करणार; शक्तिकेंद्र प्रमुख बुथप्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्धार

पलूस तालुक्यात सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भाजप भक्कम करणार; शक्तिकेंद्र प्रमुख बुथप्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्धार

पलूस तालुक्यात सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भाजप भक्कम करणार; शक्तिकेंद्र प्रमुख बुथप्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्धार 


पलूस प्रतिनिधी:
पलूस येथे भाजपचे सांगली जिल्हा संघटन सरचिटणीस विलास काळेबाग यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यता नोंदणी अभियंनंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. पलूस कडेगाव तालुक्यात भाजप मजबूत स्थितीत असून बूथनिहाय मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून भाजप भक्कम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. 

सांगली जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे पृथ्वीराज बाबा देशमुख,संग्रामभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका विधानसभा निवडणुकीत सातत्याने यश मिळवले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे त्यामुळे जिह्यात सभासद नोंदणी मोठ्याप्रमाणात होईलच पण पलूस कडेगाव तालुक्यात सर्वाधिक सभासद नोंदणी होईल असा विश्वास दत्ता उतळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

जिल्हा संघटन सरचिटणीस विलास काळेबाग यांनी सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करून सदस्यता नोंदणी अभियानाबाबत सविस्तर माहिती सांगितली. सदस्यता नोंदणी अभियानात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ सर्वात पुढे राहायला पाहिजे असे सांगितले. 


 भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी पलूस कडेगाव तालुक्यातून मोठ्याप्रमाणात सभासद नोंदणी करू असे सांगितले. जेष्ठ नेते शिवाजीनाना मगर यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसाठी सदस्यता नोंदणी गरजेची असल्याचे सांगितले.भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्ता उतळे यांनी स्वागत केले.

जेष्ठ नेते राजारामबापु पाटील सुर्यकांत काका बुचडे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर,भाजपा युवा मोर्चाचे रोहित पाटील ,अमीर पठाण, वसंतदादा कारखान्याचे संचालक सुरेश पाटील ,जवाहर पाटील, नारायण खटावकर, पिंटू मोरे, संजय गोंदील भानुदास सूर्यवंशी,सागर सूर्यवंशी, जयवंत मदने आदिसह मान्यवर उपस्थित होते.

To Top