Sanvad News वाईट गोष्टी विरोधातील बंडा सोबत चांगल्या गोष्टीही प्रभावीपणे मांडा - गिरीश चितळे;भिलवडी सार्वजनिक वाचनालयात पत्रकार दिन साजरा

वाईट गोष्टी विरोधातील बंडा सोबत चांगल्या गोष्टीही प्रभावीपणे मांडा - गिरीश चितळे;भिलवडी सार्वजनिक वाचनालयात पत्रकार दिन साजरा

वाईट गोष्टी विरोधातील बंडा सोबत चांगल्या गोष्टीही प्रभावीपणे मांडा - गिरीश चितळे;भिलवडी सार्वजनिक वाचनालयात पत्रकार दिन साजरा

भिलवडी प्रतिनिधी:
सार्वजनिक वाचनालयात भिलवडी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.चनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
लोकशाही मध्ये समाज समृद्धीकडे वाटचाल करीत असताना वाईट गोष्टी विरुद्ध बंड करणे गरजेचे आहे पण चांगल्या गोष्टीही समाजापुढे प्रभावीपणे मांडणे गरजेचे आहे.सोशल मीडियाचा समाज मनावर अधिक प्रभाव असताना त्याचा पत्रकारांनी योग्य असा वापर करावा असे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केले.
वाचन उपक्रम महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत भिलवडी आणि परिसरातील सर्व पत्रकारांनी सुभाष कवडे यांच्या हिरवी हिरवी झाडे या पुस्तकाचे वाचन केले.
यावेळी सतीश तोडकर,प्रदीप माने,अभिजित रांजणे,भिलवडी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनःश्याम मोरे,उपाध्यक्ष चंद्रमणी रांजणे,शरद जाधव,भाऊसाहेब रूपटक्के,शशिकांत राजवंत,रोहित रोकडे, पलूस तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सूरज शेख,मुनीर पट्टेकरी,पंकज गाडे,विशाल कांबळे,सचिन टकले,श्रीकांत जंगम आदी पत्रकारांचा पुस्तक भेट सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व स्वागत डी. आर.कदम यांनी केले. कार्यवाह सुभाष कवडे यांनी सूत्रसंचालन केले. जयंत केळकर यांनी आभार मानले.यावेळी जी.जी.पाटील, हणमंत डिसले,हकीम तांबोळी,जयदीप पाटील आदी उपस्थित होते.सौ.मयुरी नलवडे,सौ.विद्या निकम आदींनी संयोजन केले.
To Top