Sanvad News कडेपूर सोसायटीने सभासदांचे हित जोपासले : सतीश देशमुख ;कै.आ. संपतराव देशमुख शेतकरी कन्यादान योजनेअंतर्गत सभासदाला धनादेश वाटप

कडेपूर सोसायटीने सभासदांचे हित जोपासले : सतीश देशमुख ;कै.आ. संपतराव देशमुख शेतकरी कन्यादान योजनेअंतर्गत सभासदाला धनादेश वाटप

 कडेपूर सोसायटीने सभासदांचे हित जोपासले : सतीश देशमुख;कै.आ.संपतराव देशमुख शेतकरी कन्यादान योजनेअंतर्गत सभासदाला धनादेश वाटप


कडेपूर प्रतिनिधी :

कडेपूर (ता. कडेगाव) येथील कडेपूर सर्व सेवा सहकारी सोसायटीने सभासदांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. संस्थेच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कै.आ. संपतराव देशमुख शेतकरी कन्यादान योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा पहिला लाभार्थी सभासद संजय एकनाथ यादव यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
सभासदांच्या आर्थिक सहकार्याला हातभार लावणारी ही योजना सभासदांच्या गरजांशी जोडलेली आहे. यावेळी सरपंच सतीश देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले,
“कडेपूर सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सभासदांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आर्थिक आधार देण्याचा सोसायटीचा वसा कायम आहे. भविष्यातही सभासदांसाठी उपयुक्त योजना राबवण्याचा आमचा मानस आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन धन्यकुमार यादव होते. त्यांनी सांगितले की,२०२२-२३ या आर्थिक वर्षात सोसायटीने ४३ लाख रुपयांचा नफा मिळवला असून, तो नफा सभासदांच्या भल्यासाठी उपयोगात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सभासदांना आर्थिक सुरक्षेची हमी देणाऱ्या अनेक नव्या योजना सुरू केल्या जातील.”
व्हा. चेअरमन शंकर यादव यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की,“संस्था सतत प्रगतीच्या दिशेने पुढे जात असून सभासदांचे हित जोपासण्यास कायम कटिबद्ध राहील.”सभासदांच्या वतीने चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले.कर्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी वैभव महाजन, सोसायटीचे सर्व संचालक, कर्मचारी, व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top