Sanvad News पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ - धनंजय देशमुख ;पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ - धनंजय देशमुख ;पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान

 पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ- धनंजय देशमुख; पत्रकारदिना निमित्त कडेगांव नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान

कडेगांव प्रतिनिधी : समाजात अन्याय होत असल्यास त्याला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतात तरीदेखील पत्रकार निर्भीड व निपक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जात असल्याचे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले. 
ते कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये मराठा पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी बोलत होतें यावेळी उपनगराध्यक्ष पै. अमोल डांगे, बांधकाम सभापती विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, युवराज राजपूत, हाजी मुक्तार पटेल प्रमुख उपस्थित होते. 
यापुढे बोलताना देशमुख म्हणाले ६ जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले. त्याचे स्मरण म्हणून आपण हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो. शहरातील विविध समस्या पत्रकारांनी आम्हाला निदर्शनास आणून द्याव्यात त्यावर आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ येत्या काही दिवसात कडेगाव शहराला मोठा विकास निधी मिळणार असून शहराचा चेहरा मोरा बदलणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिराजी देशमुख यांनी केले प्रताप महाडिक, प्रवीण पवार, सदानंद माळी पत्रकारांनी आपली मनोगति व्यक्त केली. यावेळी हिराजी देशमुख, संतोष कणसे,प्रताप महाडिक,प्रविण पवार, रजाअली पीरजादे,सचिन मोहिते,प्रशांत पाटणकर,परवेझ तांबोळी, गणेश पवार,राजेश महाडिक,मयूर तवटे,सुरज जगताप,चेतन सावंत, हेमंत व्यास, दत्ता पवार,संजय कोरे,सदानंद माळी, गोरख औंधे उपस्थित होते.
To Top