शरद आत्मनिर्भरच्या वतीने बांबवडेत महिलांसाठी 'थायरॉईड' व 'सी.बी.सी. तपासणी शिबीर
संवाद न्यूज पलूस प्रतिनिधी
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त बांबवडे (ता. पलूस) येथे खास महिलांसाठी मोफत 'थायरॉईड' व 'सी.बी.सी. तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन शरद फौंडेशनच्या अध्यक्षा धनश्री लाड यांनी केले.या शिबीरामध्ये थायरॉईड ग्रंथीच्या कार्याचे मूल्यांकन केले जाते. त्याचप्रमाणे रक्तातील थायरॉईड उत्तेजक संप्रेरक (TSH), थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायओडोथायरोनिन (T3) यांचे प्रमाण मोजण्यात येते.
सुरवातीला थायरॉईड तपासणी शिबीरात रक्ताचा नमुना घेतला जातो. या चाचणीमुळे थायरॉईड ग्रंथी किती चांगले काम करत आहे हे समजते. थायरॉईड विकारांच्या उपचारांचे निदान आणि निरीक्षण करण्यात मदत होते. थायरॉईड ग्रंथीमध्ये गुठळ्या, सूज, कर्करोग यासारख्या समस्यांचे निदान होते. थायरॉईड रोगांचे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि थायरॉईड चाचण्यांचा वापर केला जातो, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपस्थित महिलांना देण्यात आली.शनिवारी घेण्यात आलेल्या या शिबिराला गावातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी क्रांती कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन पोपटराव संकपाळ, सरपंच अरविंद मदने, उपसरपंच पांडुरंग संकपाळ, दिपक मदने, विनायक महाडिक, किरण लाड, सुनिल भोसले, बांबवडे गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी, पाणी पुरवठा संस्था, सिद्धेश्वर वाचनालय अशा सर्व संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.