कडेगांव तालुक्यात महसूल प्रशासन जोमात अवैद्य गौण खनिज तस्कर कोमात
कडेगांव प्रतिनिधी :
कडेगांव तालुक्यात होणाऱ्या अवैद्य गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. विनापरवाना दगड, मुरूम वाहतूक करणाऱ्या २ डंपरवर प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, यांच्या पथकाने सुट्टीच्या दिवशी कारवाई केली आहे.
शनिवारी दि .१५ फेब्रुवारी रात्री ०८ वा. मौजे उपाळे वांगी,ता.कडेगांव येथील रस्त्यावर दगड,मुरूम वाहतुक करणाऱ्या कृष्णत श्रीरंग पिसाळ यांच्या एम एच १० बी आर २९९९ या डंपर व रविवारी दी. १६ फेब्रुवारी मौजे तोंडोली, ता.कडेगांव येथे सचिन विलास घार्गे यांच्या एम एच १० झेड १९४८ या २ डंपरवर प्रांताधिकारी रणजीत भोसले,तहसीलदार अजित शेलार व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी जायभाई, तलाठी कणसे, तलाठी मुंढे यांनी कारवाई करुन वाहने जप्त करून तहसीलदार कार्यालय परिसरात लावण्यात आली आहेत.
अनधिकृत व अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुठलीही हलगर्जी होणार नाही. त्यामुळे अशा कारवाया होत राहतील. अवैद्य गौण खनिज तस्करांनी इथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे -रणजीत भोसले प्रांताधिकारी, पलुस-कडेगाव